प्रतिष्ठा न्यूज

आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक अमित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरी-पुणे येथे रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पुणे प्रतिनिधी : परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक अमित माळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, “भक्ती की लहर” या प्रोजेक्ट अंतर्गत धानोरी-पुणे येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले .
या शिबिरामध्ये ४3 जणांनी रक्तदान केले. धानोरी येथील काश्मिरी भवन येथे हे शिबीर पार पडले. रक्तसंकलनासाठी ओम ब्लड बँक मंगळवार पेठ पुणे हि रक्त पेढी उपस्थित होती. दरम्यान शिबिरा ठिकाणी *आर्ट ऑफ लिविंग धानोरी* तर्फे फळे बिस्कीट, जुस यांचे वाटप करण्यात आले.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी पूजा शर्मा , अनिल नरके , आर्या , राहुल जाधव , सुखदा कोरान्ने , अंबरीश सिंग व शिखा सिंग यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.