सांगली महापालिकेत संत सेवालाल यांची जयंती साजरी
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत संत सेवालाल याना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे आणि सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांच्याहस्ते संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, प्रकाश भोसले, मंगल फोंडे, संगया मठद, प्रसाद जामसंडेकर, नवीन संबोधी आदी उपस्थित होते.