प्रतिष्ठा न्यूज

लाभार्थी संख्या आणि संवाद वाढविण्यावर भर द्या- मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचे नव नियुक्त प्रदेश सरचिटणीस, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी आज सांगली शहर आणि सांगली जिल्हा अशा दोन स्वतंत्र बैठका घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकार्‍यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला.

या दौर्‍यात मुख्यत्वे बूथ सक्षमीकरण, धन्यवाद मोदीजी अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच नुकताच पार पडलेला महाकाल लोकार्पण सोहळा नियोजन आणि अंमलबजावणी याचा देखील आढावा घेण्यात आला. आगामी काळातील केंद्रीय अभियान योजना आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या चक्रीय दौऱ्याची रूपरेषा मांडून मोहोळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे वेगळेपण हेच आहे की, येथे सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते. त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला सातत्याने पक्षात काम केल्याचे फळ वेगवेगळ्या संधीच्या रुपातून मिळाले आहे.

आगामी निवडणुका समोर ठेवून आपल्या सर्वांना बूथ सक्षमीकरणावर काम करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार आपापल्या भागातील बूथवर काम करायचे आहे. तसेच धन्यवाद मोदीजी हे अभियान राबवताना प्रत्येकाने आपापल्या भागातील विविध योजनांतील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावरही काम करायचे आहे.”

त्यासाठी मोहोळ यांनी लाभार्थी संपर्क मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या. यावेळी सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली शहराध्यक्ष दीपक बाबा शिंदे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार प्रदेश सचिव, विक्रम पावसकर, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, धीरज सूर्यवंशी, सम्राट महाडीक,स्वाती शिंदे ,भारती दिगडे, मिलिंद कोरे, दीपक माने, आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.