प्रतिष्ठा न्यूज

‘ दिवाळी माणुसकीची ‘ मैत्री फाऊंडेशन चा मदतीचा हात

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२५ : गगनबावडा, पन्हाळा,करवीर या तीन तालुक्यांमधील काही युवकांनी ‘ मैत्री फाऊंडेशन ‘ द्वारे गेले काही वर्ष सामाजिक भान ठेवत अनेक मदतीचे उपक्रम राबवले आहेत.
दोन महिन्यापूर्वी वीज वितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन रवींद्र विलास मार्गे हे तिसंगी ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेची बंद असणारी वीज सेवा सुरू करण्यासाठी गेले असता सहकार्‍याच्या चुकीमुळे विजेचा धक्का बसून डी पी वरून जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाले. आणि अखेर त्यांना आपला संपूर्ण हात गमवावा लागला.
नोकरी गेली, तुटपुंजी शेती, मोठे कुटुंब त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली. ही गोष्ट मैत्री फाऊंडेशनच्या लक्षात आली. अध्यक्ष संतोष नारकर, सचिव मनोज पडवळ, संतोष डाकवे, शिवाजी जोंधळेकर, दिलीप जाधव यांनी रवींद्र मार्गे यांचे घरी जाऊन फाउंडेशन तर्फे दिवाळी फराळ, व कपड्यांसाठी काही रक्कम भेट देऊन दिवाळी माणुसकीची व माणुसकीसाठी असते. हे कृतीतून दाखवून दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.