प्रतिष्ठा न्यूज

तासगावसह तालुक्यात गुटखा पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात प्रशासना कडून टाळाटाळ : पुरवठा करणाऱ्यांचे प्रशासना सोबत लागेबांधे मनसेचा आरोप

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात अवैधरित्या सर्व दुकानाना गुटखा पुरवत असणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी असे निवेदन मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांना दिले होते.याबाबतीत तासगाव पोलीस प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.तासगाव शहरासह तालुक्यामध्ये अवैधरित्या दुकान मालकांना गुटखा पुरविणान्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन तासगाव पोलीस निरीक्षक यांना दि.२४ फेब्रुवारी रोजी देण्यात आले होते.निवेदनानंतर १५ दिवसानंतरही हा व्यवसाय राजरोसपणे सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने त्यानंतर दि.११ मार्च रोजी स्मरणपत्र लिहून तासगाव पोलीस निरिक्षक यांना कारवाई बाबत विनंती केली होती.त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे मनसे नेते अमोल काळे यांनी 27/03/2023 ला सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांना याबाबत निवेदन देऊन स्वतः लक्ष घालून कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले होते.परंतु दोन महिने उलटून देखील त्यांच्या कडून सुद्धा कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.याबाबतीत प्रशासन कारवाई बाबत टाळाटाळ करताना दिसून येत आहे,त्यामुळे आज पुन्हा मनसे कडून जिल्हा पोलीस प्रमुखांना स्मरण पत्र देऊन पुरवठा करणाऱ्या वर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.