प्रतिष्ठा न्यूज

कंबलबाबांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईची महाराष्ट्र अंनिस ची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे.

कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात. गेली 10 वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे; या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास 1000 पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर,अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.