प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या सेवा शर्ती नियमांना शासनाकडून मंजुरी : पदोन्नती आणि सेवा भरतीचा मार्ग मोकळा : गटनेत्या भारती दिगडे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली महापालिकेच्या सेवा शर्ती नियमांना अखेर शासनाकडून मंजुरी देण्यात आली. याबाबतचा अध्यादेश आज शासनाकडून प्राप्त झाला. सेवा शर्ती नियमांना मंजुरी मिळाल्याने आता महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि उर्वरित जागांसाठी सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती मनपाच्या गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, भाजपा नेते शेखर इनामदार यांनी पाठपुरावा
केल्याचेही भारती दिगडे यानी सांगितले.
याबाबत भारती दिगडे म्हणाल्या की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची 1998 साली स्थापना झाली. या 25 वर्षात महापालिकेचा आकृतीबंध आणि स्टाफ पॅटर्न मंजूर नव्हता. मागील वर्षभरात याबाबत पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून यापूर्वी आकृतीबंदाला परवानगी दिली होती. सध्या मनुषबळ कमी पडत होते. या बाबी विचारात घेऊन अंतिम आकृतीबंध यापूर्वी मंजूर आहे. तसेच आज महापालिकेच्या सेवा शर्ती नियमास मान्यता देण्यात आली. यामुळे आता महापालिकेच्या अंतर्गत पदोन्नती आणि उर्वरित जागांसाठी सरळ सेवाभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून आकृती बंदाला मंजुरी मिळाल्यामुळे आज सेवा शर्ती नियमांना मंजुरी देण्यात आली. आता यानंतर रोस्टर (बिंदू नामावली) तपासावी लागणार असून त्यानंतर महापालिकेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नती दिली जाणार आहे त्यानंतर उर्वरित जागांसाठी सरळ सेवा भरती केली जाणार आहे. याची अमलबजाणी करताना सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही धक्का लागणार नाही याबाबत आमचे प्रयत्न असणार आहेत. तसेच समांतर आरक्षणाबाबत नियोजन करून शासनाकडून विहित आरक्षणाचा समावेश करून मगच सरळ सेवा भरती केली जाणार असल्याचेही भारती दिगडे यानी सांगितले.
महापालिकेला मंजूर पदे 2340 असून नवीन 1114 इतकी पदे मंजूर झाली आहेत अशी एकूण 3454 इतकी पदे शासनाकडून मंजूर करण्यात आली असून यापैकी नवीन 1114 पदामधून पदोन्नती दिली जाणार असून उर्वरित शिल्लक जागांसाठी सरळ सेवा भरती केली जाणार असल्याचेही भारती दिगडे यानी सांगितले. यावेळी आस्थापना अधिकारी चंद्रकांत आडके उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.