प्रतिष्ठा न्यूज

अंनिस तर्फे जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांचे शनिवारी व्याख्यान

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या 'गुणवत्ताशाहीचे अवडंबर' या विशेषांकाचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जून महिना हा विविध परीक्षांच्या निकालांचा, मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचा असतो. यावेळी समाजात गुणवत्ता आणि आरक्षण या संबंधी उलट सुलट चर्चा सुरू होते.

तथाकथित गुणवत्ता आणि आरक्षण यासंदर्भात शास्त्रीय माहिती देणारा ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी (३ जून) *जेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात (दिल्ली)* यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. सुखदेव थोरात यांचे ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. जेष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांनी हा अंक संपादित केला आहे.

हा आँनलाईन कार्यक्रम शनिवारी ३ जून रोजी सांय. ६ वा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह होईल.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ सदस्य राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, अनिल चव्हाण यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.