प्रतिष्ठा न्यूज

नविद हंगड फौंडेशन यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त १०० किलो मोफत जिलेबी वाटपाच्या उपक्रमाची दशकपूर्ती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्रीकांत चौक, लक्ष्मी मार्केट मिरज या परिसरात नविद हंगड फौंडेशन मिरज संस्थेमार्फत मोफत नागरिकांना एकूण १०० किलो जिलेबी वाटप करण्यात आली.संस्थेच्या या उपक्रमाला आज १० वर्षे पुर्ण झाली. प्रजासत्ताक दिनाचा आनंद समाजातील वंचित घटकापासून सर्वांना मिळावा आणि समाजात एकात्मता, बंधुभाव व स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो.या उपक्रमात आज प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिमान पवार (प्रसिद्ध पोट विकार तज्ज्ञ) हे उपस्थित होते. तसेच नविद हंगड आणि इतर पदाधिकारी यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आली. यावेळी  इम्रान मर्चंट, सागर भोसले, मा.वसीम मुल्ला, हेमंत माळवदे, तौफिक लंगरदार, शोएब कापशीकर, अरिफ मुल्ला, जावेद अत्तार, निसार मुल्ला, प्रशांत कुलकर्णी, निलेश सातपुते, अझर सय्यद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.