प्रतिष्ठा न्यूज

आम आदमी पार्टीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासोबत भारतीय संविधान उद्देशिका पत्रिका वाटप व वाचन उपक्रम उत्साहात संपन्न….

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : भारतीय प्रजाकसत्ता दिनानिमित्ताने आम आदमी पार्टी, मुख्य कार्यालय, मिरज येथे ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर व्यक्तींना विशेष करून पक्षाने आमंत्रित केले होते. या कार्यक्रमास उद्योजक नवीद हंगड, प्रसिद्ध शाहीर  रामलिंग तोडकर,ॲड. माणिक तेग्गी, हाजी शौकतसाहब  चौधरी,अभिजित म्हेत्रे व इतर मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली. ध्वजारोहण करून सर्वांमध्ये भारतीय संविधान उद्देशिकेच्या पत्रिका वाटण्यात आल्या व सामुदायिक पठन देखील करण्यात आले. यानंतर नागरिकांना जिलेबी वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. सर्व मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवीद हंगड हे होते. तसेच युवराज मगदूम यांनी सूत्रसंचलन केले. आभार संदीप कांबळे यांनी मानले.सदर उपक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला, जिल्हा समन्वयक कृष्णा आलदर, सह-समन्वयक आरिफ मुल्ला, सचिव युवराज मगदूम, संघटक फय्याज सय्यद, खजिनदार जोहेब मुल्ला, सह संघटक संतोष मगदूम, युवा आघाडी अध्यक्ष सागर भोसले, उपाध्यक्ष तौफिक हवलदार, सचिव निसार मुल्ला, मिरज शहरचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष रवी बनसोडे, संघटक श्रीकांत चंदनवाले, निवृत्ती जाधव, अझहर मुतवल्ली, जहांगीर आगा व संदीप कांबळे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव इमरान पठाण, सतीश सौंदडे, कुपवाड शहरचे राम कोकरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.