प्रतिष्ठा न्यूज

भारतीय समाज सेवा संस्था द्वारा संचालित मातोश्री वृद्धाश्रम, चंद्रपूर येथे रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /योगेश अगडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दि. २६ : उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी भारतीय समाज सेवा संस्था द्वारा संचालित मातोश्री वृद्धाश्रम भिवकुंड नाला, बल्लारपूर रोड, विसापूर (जि. चंद्रपूर) येथे आयोजित रौप्य महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेच्या वतीने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे भव्यदिव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. तसेच, संस्थेसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल *राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस* यांच्या शुभहस्ते *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांना स्मृतिचिन्ह भेट देऊन गौरविण्यात आले, परंतु सदर कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी स्मृतिचिन्ह स्वीकारले. त्यानंतर *श्री. शैलेशजी बागला* यांच्या शुभहस्ते आमदार बंटीभाऊंना स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ भेट देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक भारतीय समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी पालकमंत्री *मा.श्रीमती. शोभाताई फडणवीस* व मुख्यतः *राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस* यांचे व अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, सर्व मान्यवर मंडळींनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी वार्तालाप करून त्यांच्यासोबत छायाचित्र काढले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.