प्रतिष्ठा न्यूज

गुन्हेगार पोसणाऱ्यांना कायद्याची चिंता – पृथ्वीराज पवार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली – इस्लामपूरपासून सांगलीपर्यंत गुंड, दलाल, ब्लॅकमेलर्सना कुणी पोसले आहे हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यांनीच कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढावा, हे आश्‍चर्य आहे. पोलिसांची जबाबदारी आहेच, मात्र त्यावर बोलणाऱ्यांनी आधी आपल्या पक्षाच्या आश्रयाने वाढलेल्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या आश्रयाने सांगलीची अवस्था बिहारपेक्षा वाईट होत आहे, अशी टीका भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.
त्यांनी पत्रकारांना म्हटले आहे, की गँगवॉर, गोळ्या घालून खून असे प्रकार घडत असताना यामागचे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, अशा लोकांना सुसंस्कृत सांगलीच्या राजकारणात उतरवण्याचे पाप केले जात आहे. झाडून गुन्हेगार, सावकार, तस्कर, मोकातील आरोपी, खंडणीखोर व बलात्कारातील आरोपी गोळा करुन सांगलीत राजकीय गॅंग केली गेली आहे. व्यापाऱ्यांना खंडणीसाठी जेरीस आणणे, डॉक्टरांना लूटणे, ब्लॅकमेलिंग करणे याचा परवाना असल्यासारखे हो लोक वागत आहेत. त्यांना पोलिसांनी अटकाव केल्यावर सोडवायला जाणारे कोण आहे, हेही जनतेला माहिती आहे. कुख्यात गुन्हेगाराच्या खांद्यावर हात ठेवून पोलिस मुख्यालयात फिरणारे आणि कुख्यात चंदन तस्कराच्या घरी सांत्वनाला जाणारे कायद्याचा कळवळा करताहेत.
महाविकास आघाडीच्या काळात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींची हद्दपारी, मोकाची कारवाई रद्द करून घेतली, व त्याच लोकांनाच उजळ माथ्याने राजकीय व सामाजिक वयसपिठावर नेत्यांचा मांडीला मांडी लावून बसलेले पाहणयाचे दुर्दैव सांगलीकरांचा माथी मारले . त्या मुळे वाढलेली गुन्हेगारी व बिघडलेली कायदा सुव्यवस्था यावर राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्याआधी आपल्या पक्षाच्या जीवावर वाढलेल्या गुन्हेगारांकडे एकदा पहावे. ज्यांनी तुम्हाला पालखीत घालून सांगलीत आणले त्यांचेच पाय तुम्ही कापले. आता तुम्हाला पक्ष वाढवण्यासाठी गुन्हेगारांची फौज भरावी लागत आहे. तडीपार गुंडांच्या टोळ्यांना सोबत घेऊन चर्चा करणे, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावणे, हे प्रकार काय सांगतात. आमच्याकडेही पुरावे आहेत, वेळ आल्यावर ते समोर आणू.
तूर्त पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारांच्या टोळ्या मोडण्यास प्राधान्य द्यावे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. जे राजकीय पक्षाच्या बळावर दहशत माजवत आहेत, गुंडागिरी करत आहेत, त्यांचा बंदोबस्त करताना कुणाचा दबाव घेण्याचे कारण नाही. या कारवाईत कुणी कितीही आड आला तर त्याच्या टोळ्यांचा पंचनामा आम्हीच करू. सर्व पुरावे राज्याचे गृह मंत्री व सांगलीकरांचा समोर ठेवु.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.