प्रतिष्ठा न्यूज

तासगावात भव्य शोभा यात्रा संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी समिती व तासगावातील आर. आर. पाटील ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिसरकार व स्वांतत्र्याची चळवळ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.येथील सानेगुरुजी नाट्यगृहात प्रसिद्ध वक्ते प्रा.निरंजन फरांदे यांनी प्रतिसरकार व स्वातंत्र्याची चळवळ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षस्थानी कुंडल येथील क्रांती सह कारखान्याचे अध्यक्ष अरुण अण्णा लाड होते.त्यांनी जी. डी. बापूंचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विषद करून युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असे स्पष्ट केले.याप्रसंगी प्रास्ताविक व्ही वाय पाटील (आबा) यांनी केले तर आर. आर. पाटील ज्ञानप्रबोधिनीच्या अध्यक्षा उल्का माने यांनी स्वागत केले तर आभार प्रा.जी के पाटील यांनी मानले.सूत्रसंचलन योगिता माने यांनी केले.शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.यावेळी या शोभा रथयात्रा स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.यावेळी आ.सुमनताई पाटील, डॉ. बाबूराव गुरव,अशोक पवार यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.