प्रतिष्ठा न्यूज

खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून जिना यहाँ मरणा यहाँ या सजीव देखाव्याला सागलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या आनंद टॉकीज शेजारील खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी स्वर्गीय राज कपूर यांच्यावर आधारित
*जिना यहाँ मरणा यहाँ* हा सजीव देखावा साकारण्यात आला होता. खोकी संघटना गणेश उत्सव मंडळाकडून गेल्या 42 वर्षापासून सजीव देखाव्यांची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे. आज 43 व्या वर्षीही मंडळांनी सजीव देखावे सुरू ठेवले आहेत. मंडळाचे संस्थापक भीमराव चव्हाण यांनी या सजीव देखाव्यांची परंपरा 1981 साली सुरू केली होती. आज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे कायम ठेवली आहे. पाचव्या दिवशी सादर करण्यात आलेला *जिना यहाँ मरणा यहाँ* या  देखाव्यास गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी या देखाव्याचा भेट देत आनंद घेतला. या देखाव्यामध्ये स्वर्गीय राज कपूर यांची भूमिका दीपक चव्हाण यांनी साकारत अनेक सामाजिक संदेश सुध्दा यावेळी देण्यात आला. या देखाव्याचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष सतीश चव्हाण, सचिव राजू गडकरी, उपाध्यक्ष गणेश चव्हाण मंडळ सदस्य राहुल चव्हाण,  सोन्या वळीव, तुषार भंडारे, ओम चव्हाण अरुण अडसुळे, ओंकार गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, सुरेश चव्हाण,  शंभूराज चव्हाण, आरिफ शेख आदींनी केले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.