प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पुरनियंत्रणासाठी मुंबई येथे बैठक संपन्न : जागतिक बॅंकेचे प्रतिनिधी व राज्य शासन अधिकाऱ्यांची प्रमूख उपस्थिती ; खासदार संजयकाका पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : आज मुंबई येथील निर्मल टॉवर येथील निती आयोगाच्या धरतीवर स्थापन करण्यात आलेल्या’मित्र संस्था’ येथे सांगली व कोल्हापूर येथे येणाऱ्या महापुराच्या नियंत्रणाकरीता व पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याकरीता बैठक आयोजीत करण्यात पार पडली, अशी माहीती संजयकाका पाटील यांनी दिली. सदर बैथकीस तेही उपस्थित होते.
खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बॅंकेने या प्रकल्पाकरीता सुमारे ४००० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केलेले आहे. या निधीच्या योग्य विनियोगाच्या अनुषंगाने बैठकीमध्ये मित्र संस्थे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रवीण परदेशी यांनी पुरनियंत्रण प्रकल्पान्तर्गत केल्या जाणाऱ्या कामांचे सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दिपक कपूर यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा, तसेच महापुराचे वापराविना वाहून जाणाऱ्या पाण्याचा अहवाल, कृष्णा-भिमा स्थिरिकरण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा केली. यावे जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींसोबत सखोल व सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींच्या ३ टीम महापूर बाधीत क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुर्नियंत्रण कामे, भुस्खलन उपाययोजना, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षीत करणे, पुराची पुर्वकल्पना देणे आपत्तीव्यवस्थापन करीता लागणारी सामुग्री व उपकरणे खरेदी करणे आदी कामे केली जाणार आहेत, असे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.
यावेळी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी, आपत्तीव्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.