प्रतिष्ठा न्यूज

जुगार अड्यावर छापा एकुण ११,१४,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त; उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या पथकांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जुगार अड्यावर छापा टाकून एकुण ११,१४,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व त्यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी,
१) अक्षय सुनिल धुमाळ वय २२ वर्षे
२) प्रशांत संजय घोरपडे वय २६ वर्षे
३) साईराज नंदकुमार बोडरे वय ३४ वर्षे
४) अमित महेश भिंगारदिवे वय २४ वर्षे
५) बिरजु दिनेश पंडीत वय २९ वर्षे ६) नाथा सुदाम गुरव वय ४० वर्षे
अ.क्र. १ ते ५ राहणार विटा अ.क्र. ६ राहणार कडेगांव

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
दिंनाक १३.०९.२०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांना मिळाले माहितीच्या आधारे नेवरी गावाचे हद्दीत नेवरी गावाचे हद्दीत राहुल महाडिक याचे शेतातील पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये काही लोक पत्याची पाने खेळत असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सदर रेड कामी सर्व साहित्य तसेच टिम व कडेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार असे रवाना होऊन नेवरी गावाचे हद्दीत पत्र्याचे शेडमध्ये पत्याच्या पानाने खेळण्याचा परवाना नसताना बेकायदेशीर बिगरपरवाना स्वतःच्या फायदयाकरता तीन पानी पत्याच्या पानावर पैसे लावुन जुगाराचा खेळ खेळत असताना रोख रक्कम ५४,०००/- रुपये व एकुण दुचाकी ०५ व एक चारचाकी गाडी असा १०,६०,०००/- असा एकुण ११,१४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे.

सदरबाबत श्रीकांत दत्तात्रय कुंभार पोलीस नाईक ब.नं. ५७३ नेमणुक विटा पोलीस ठाणे प्रतिनियुक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांनी फिर्यादी दिली असुन पुढील तपास कडेगांव पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ १८९० हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी*
मा. पोलीस अधीक्षक, श्री संदीप घुगे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील, संग्राम शेवाळे, पोलीस निरीक्षक, कडेगांव पोलीस ठाणे सचिन माळी, पोलीस उपनिरीक्षक, वाहतुक शाखा विटा उपविभागीय कार्यालय विटा विभाग विटा याचेकडील १) पोहवा शिवाजी माळी, २) पोलीस नाईक श्रीकांत कुंभार, ३) पोकॉ निरज बारापत्रे, कडेगांव पोलीस ठाणेकडील १) पोहवा आशिष जाधव, २) निकम

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.