प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी जेरबंद : २३ तोळे दागिने जप्त; संजयनगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्याच्या कडून २३ तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संजयनगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी, दि. ०९.३.२०२४ रोजी फिर्यादी नामे सौ. वैजयंता महादेव बेरडे, रा. मंगलमुर्ती कॉलनी, कुपवाड या त्यांचे कुटूंबियांसोबत त्यांचे मुळ गावी कर्नाटक येथे गेले असता, त्यांचे राहते घराचा दरवाजा कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तसेच संजयनगर पोलीस ठाणेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन नमुद गुन्हा उघड करणेबाबत मार्गदर्शन करून निर्देश दिले होते.

त्या अनुशंगाने दि. ११/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील पोहेकों/ बिरोबा नरळे, यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत मंगलमुर्ती कॉलनी तुळजाईनगर येथे झालेली घरफोडी चोरी ही आकाश कवठेकर या रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या आरोपीने केली असून तो आपटा पोलीस चौकीजवळील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, आपटा पोलीस चौकीजवळील पाण्याच्या टाकीजवळ निगराणी करीत असताना, एक इसम रोड कडेला संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव आकाश सतीश कवठेकर, वय २६ वर्षे, रा. भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड असे असलेचे सांगितले. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता, दोन दिवसापुर्वी मंगलमुर्ती कॉलनी तुळजाईनगर येथे झालेली घरफोडी चोरी ही त्याने केली असल्याची कबूली दिली. सदर आरोपीस पुढील तपास कामी

संजयनगर पोलीस ठाणेकडे रिपोर्टाने वर्ग करण्यात आले.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, संजयगर पोलीस ठाणे यांनी पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे, संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाच्या अनुशंगाने आकाश कवठेकर याचेकडे अधिक तपास केला असता, निवेदन पंचनाम्याने त्याने उमेदनगर, कुपवाड येथील राहते घराचे पाठीमागील मोकळया शेतात लाकडी पेटीत चोरीचे दागिने पुरून ठेवले असल्याचे सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी सदर गुन्ह्यातील वरील वर्णनाचा सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.

आकाश सतिश कवठेकर हा रेकॉडवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सांगली, सोलापुर जिल्हयात घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीकडे अधिक तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.