प्रतिष्ठा न्यूज

जबरी चोरीतील तीन चोरट्यांना अटक संपुर्ण सोन्याचे दागिने हस्तगत; संजयनगर पोलीसांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जबरी चोरीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून संपुर्ण सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. सांगलीतील संजयनगर पोलीसांनी ही कारवाई केली.
*आरोपींची नावे अशी,* वाहीद मुसा पखाली वय. ४९ वर्षे रा. महंमदीया मस्जीद जवळ, शिंदे मळा, सांगली ), सलीम मेहबूब शेख वय, ३५ वर्षे रा. स्वस्तिक वे ब्रीज चे मागे, संजय गांधी झोपडपट्टी, टिंबर एरीया, सांगली., तातोबा लक्ष्मण कांबळे वय. ५० वर्षे रा. नविन वसाहत, उ. शिवाजी नगर, सांगली.

*जप्त मुद्देमाल*
१) ३५,०००/- रूपये किंमतीचे कानातील डिझाईनचे सोन्याचे कर्णफुले व झुबे अशा वर्णणाचे १० ग्रॅम वजनाचे जु.वा.किं.अं.
२) ३५,०००/-रूपये किंमतीचे निंबुळया आकाराचे १० ग्रॅम वजनाची गळयातील सोन्याची बोरमाळ जु.वा.किं.अं.
३)२०,०००/- रूपये किंमतीचे ०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण त्यामध्ये काळे व पिवळे सोन्याचे मणी व पदक असलेले जु.वा.किं.अं.
४) ५००/- रूपये किंमतीचा एक मोबाईल जु.वा.कि.अं.
असा एकूण ९०५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

*गुन्ह्याची हकिकत अशी*
दिनांक ०५.०६.२०२४ रोजी रात्रो ११.३० वा. चे सुमारास संजयनगर येथील दत्त कॉलनी, राजास्वामी व्यायाम शाळेजवळ फिर्यादी नामे सी संगीता रामचंद्र ठोंबरे वय. ५५ वर्षे रा. दत्त कॉलनी, राजास्वामी व्यायाम शाळेजवळ, दुधाळ

शाळेजवळ, सांगली. यास तीन अनोळखी इसमांनी घराम येवून त्यापैकी एकाने फिर्यादीचे पतीचे डोळयात चटणी टाकूण त्यांचे पोटास चाकू लावून व गळयास विळा लावून फिर्यादीचे गळयातील बोरमाळ व कानातील कर्णफूले जबरदस्तीने काढून घेवून घरातील डब्यात ठेवलेले गंठण घेवून गेले आहेत म्हणून वगैरे संजयनगर पोलीस ठाणेस सीसीटीएनएसगुरनं १२३/२०२४ भा न्या से कलम ३०९ (३) (४),३३३,३५१(३), ३ (५) (६) प्रमाणे गुन्हा दि.०६/०७/२०२४ रोजी दाखल झालेला होता.

गुन्हयाचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना मा पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे सोो मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर साो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव साो, यांनी दिल्या होत्या दिले सूचनेप्रमाणे मा पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीरण शाखेकडील पोहेकों /७९ विनोद साळुंखे, पोहेकों/१२७९ संतोष पुजारी, पोहेकों/७४७ दिपक गायकवाड, पोहेकॉ/१३३० नवनाथ देवकते, पोशि/१६५१ सुशांत लोंढे, पोशि/१३१ आकाश गायकवाड असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामर्फत वरील तिघांनी सदरचा गुन्हा केलेची माहीती मिळाली. मिळाले बातमीप्रमाणे सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबूली दिली आहे. त्यांचे कडून वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलावर सय्यद हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे सो, मा अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर साो मा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री आण्णासाहेब जाधव साो मा पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरीक्षक दिलावर सय्यद पोहेकॉ/७९ विनोद साळुंखे, पोहेकॉ/१२७९ संतोष पुजारी, पोहेकॉ/७४७ दिपक गायकवाड, पोहेकॉ/१३३० नवनाथ देवकते पोशि/१६५१ सुशांत लोंढे, पोशि/१३१ आकाश गायकवाड

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.