प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील विश्रामबाग येथील “ओन्ली आज्या” गँगवर मोक्का कायद्यान्वये मंजुरी – ७ आरोपी कचाट्यात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी :
कोल्हापुर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगलीतील विश्रामबाग येथील “ओन्ली आज्या” गँगवरील दाखल गुन्हयास दिली मोक्का कायद्यान्वये मंजुरी दिली असून ७ आरोपी मोक्याच्या कचाटयात आले आहेत. सांगली जिल्हा पोलीस यांनी ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी,
विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र. नं. ९३/२०२४ भा.दं. वि.सं. कलम ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी व त्याचे मित्र असे गप्पा मारत बसले असता, विकी पवार व कुणाल पवार हे गल्लीतुन मोटर सायकलवरून जात असंताना, अश्विनकुमार याने पुढे रस्ता नाही, दुसऱ्या रस्त्याने जावा असे सांगितलेने त्याचा राग मनात धरून विकी पवार याने त्याचे मित्र कुणाल पवार, गणेश रामाप्पा पैवळे, अमोल कुचीकोरवी, अजय खोत, सुजित चंदनशिवे व इतर अनोळखी इसम असे हत्यारासह घटनास्थळी येवून विकी पवार याने फिर्यादीचा मित्र अश्विनकुमार यास तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून त्यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील चाकुने पोटात भोकसून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादीचा मित्र अश्विनकुमार हा त्यास वाचविण्यास गेला असता, विकी पवार याने फिर्यादीचे डावे हातावर चाकुने वार करून त्यास देखील जखमी केले व इतर आरोपींनी त्यांचे जवळ असलेल्या हत्याराने फिर्यादीला व अश्विनकुमार यांना मारहाण करून त्यांनी सोबत आणलेल्या मोटर सायकल पैकी तीन मोटर सायकल त्याच ठिकाणी सोडून इतर मोटर सायकल वरून बसून हवेत हत्यार व हॉकी स्टीक नाचवत आमचा नाद करायचा नाही, केला तर त्यास सोडणार नाही असे म्हणत दहशत माजवत निघून गेले. गुन्ह्यातील जखमी अश्विनकुमार यास औषधोपचाराकरीता दवाखान्यात दाखल केले होते. त्याचेवर औषधोपचार चालू असताना तो मयत झाल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली हे करीत असताना, नमुद गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख
१) अजय ऊर्फ अजित पांडुरंग खोत, वय २३ वर्षे, रा. वडर गल्ली, बाल हनुमान गल्ली, टिंबर एरीया, सांगली तसेच टोळी सदस्य

२) विकी प्रशांत पवार, वय २३ वर्षे, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी, उत्तर शिवाजी नगर, सांगली ३) कुणाल प्रशांत पवार, वय २२ वर्षे, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी, उ. शिवाजी नगर, सांगली

४) गणेश रामाप्पा ऎवळे, वय ३६ वर्षे, रा. गोकुळनगर, गल्ली नंबर २, सांगली ५) सुजित दादासाो चंदनशिवे, वय २९ वर्षे, रा. उत्तर शिवाजीनगर, फायर स्टेशन समोर, सांगली

६) अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी, वय-२८ वर्षे, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी, सांगली ७) अर्जुन हणमंत पवार, वय-२२, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, रेल्वे स्टेशन रोड, सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणेच्या हद्दीत “ओन्ली आज्या” नावाची एक संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण केली असल्याचे दिसून आले.
अजय ऊर्फ अजित पांडुरंग खोत व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजिवीकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करीत नाहीत. या टोळीचे कार्यक्षेत्र विश्रामबाग पोलीस ठाणेचे आजुबाजुचे परिसरात आहे. सन २०१४ पासुन सन २०२४ पर्यंत आज अखेर सतत गुन्हयांची मालिका केली आहे. या टोळीने टोळीचे वर्चस्व टिकविण्यासाठी व आर्थिक फायदयासाठी व इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करुन बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, घातक हत्यारे घेवून नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी, खंडणी मागणे, किरकोळ कारणावरुन खुन करणे, खुन करण्याचा प्रयत्न करणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, टोळीची दहशत रहावी म्हणुन गंभीर दुखापतीचे गुन्हे करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बंद घरे फोडून, उचकटून चोऱ्या करणे तसेच बेकायदेशीर बिगर परवाना शस्त्रे बाळगणे इत्यादी शिर्षकाखाली शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत. ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत असुन विश्रामबाग परिसरात या टोळीने त्यांची दहशत निर्माण केलेली आहे असे एकंदर तपासात निष्पन्न झाले.

त्यामुळे सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ⅰ), (ii), ३ (२), ३ (४), ४ अन्वये वाढीव कलमे लावुन तपास करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांना सादर केला होता. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर व पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन सदरचा प्रस्ताव मोक्का कायदयान्वये तपास करणेची मंजुरी मिळणे कामी मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचेकडे सादर केला होता.

मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम (मोक्का) कायद्यान्वये कलम वाढ करून तपासाची मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर, मा. पोलीस अधिक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, विश्रामबाग पोलीस ठाणे, सेवानिवृत्त श्रेणी पोउपनि/सिद्धाप्पा रुपनर, पोहेकॉ / अमोल ऐदाळे, पोकॉ/दिपक गट्टे, स्था.गु.अ. शाखा, तसेच पोहेकॉ / बसवराज शिरगुप्पी, मपोकों / पुजा जगदाळे व विश्रामबाग पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अमंलदार यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.