प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील प्रभाग १० आणि ११ मधील कलानगर चिंतामणीनगर परिसरात नाला बांधणीचा प्लॅन करा : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची महापालिका प्रशासनास सूचना

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.१४ :- सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १० व ११ मधील कलानगर, नंदनवननगर, समृद्धी कॉलनी, गोल्डन पार्क, चिंतामणीनगर, राजगुरुनगर, राम रहीम कॉलनी, हॅपी होम व संलग्न परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सुटला पाहिजे. त्यासाठी त्या परिसरात नाला बांधणीचे काम हाती घेतले पाहिजे, अशा सूचना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
आमदार गाडगीळ म्हणाले, या परिसरातील सांडपाण्याचा आणि नाल्याचा प्रश्न संपवण्यासाठी तातडीने नालाबांधणीचे प्लॅन आणि एस्टिमेट तयार करा. ते महापालिकेला सादर करा म्हणजे हा प्रश्न कायमचा दूर होऊ शकेल.
या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सांडपाण्याचा तसेच नाल्याचा प्रश्न सातत्याने पुढे येत होता. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी प्रत्यक्ष तेथील भागात महापालिका प्रशासनासह जाऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करून नाला बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करा आणि ते महापालिका प्रशासनास सादर करा. नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला पाहिजे असेही आमदार गाडगीळ म्हणाले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे, नगर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शहर अभियंता आप्पा हलकुडे, आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, ड्रेनेज विभागाचे कुरणे व तेजस शहा, शाखा अभियंता दीपक पाटील यांच्याबरोबर आमदार गाडगीळ यांनी या प्रश्नाबाबत चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक मुन्नाभाई कुरणे, माजी नगरसेवक संजय यमगर, सुजित काटे, सुरज पवार, अभिजीत मिरासदार, प्रा. प्रशांत पाटील, संजय पाटील, पोपट जमदाडे, भरत खांडेकर, संग्राम मोहिते, सचिन काटे, बंडू माळी यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.