प्रतिष्ठा न्यूज

म्हैसाळ योजनेमधून मिरज, कवठेमंकाळ, जत व सांगोला तालुक्याला शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पूर्ण क्षमतेने पाणी देण्याची खासदार संजयकाका पाटील यांची सुचना : जलसंपदाच्या वारणाली मुख्यालयात घेतली आढावा बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मागील काही दिवसात आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून चालू आवर्तना संदर्भात काही सूचना केल्या होत्या त्या संदर्भात आज जलसंपदा विभागाच्या वारणाली येथील मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून मिरज कवठेमंकाळ तालुक्यातील गावांना शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी देणे तसेच योजनेच्या टप्पा क्रमांक पाच मधून आठ पंप चालू ठेवून जत व सांगोला तालुक्यातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासंदर्भात सूचना केल्या. उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असल्यामुळे म्हैसा उपसा सिंचन योजनेचे पंप ट्रीप होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले त्यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना योजनेला वीज सप्लाय पुरेसा व व्यवस्थित देण्यासंदर्भात सूचना केली . टेंभू उपसा सिंचन विभाग अंतर्गत खानापूर आटपाडी व कवठेमंकाळ या तालुक्यात मागणीप्रमाणे पाण्याचे आवर्तन चालू असल्याचे या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हरगुडे साहेब यांनी सांगितले तसेच टेंभू अंतर्गत विसापूर उपसा सिंचन योजना चालू असून पुनदी उपसा सिंचन योजना येत्या दोन दिवसात चालू करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले या दोन्ही योजनांना कनेर धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचे आदेश खासदार साहेबांनी दिले. ताकारी उपसा सिंचन योजनेची आवर्तन चालू असून सध्या किलोमीटर 85 पर्यंत आवर्तन सुरू असून या योजनेचे पाणी कालव्याच्या शेवटी असणाऱ्या सोनी गावापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन असल्याचे या योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्याची तीव्रता पाहता ऊस व द्राक्ष शेतीसाठी सध्या पाण्याची जास्त आवश्यकता असल्याने पाण्यापासून कोणताही भाग वंचित न राहता शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी देण्याचे सूचना श्री संजय काका पाटील यांनी केल्या. तसेच तासगाव तालुक्यातील मौजे गौरगाव येथील वंचित क्षेत्रात पाणी देणे संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश माननीय खासदार साहेबांनी दिले. एकंदरीत पाठीमागील काही दिवसात काकांनी केलेल्या सूचनानुसार विविध योजनांचे आवर्तन व्यवस्थित चालू असल्याचे निदर्शनास आले व तशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीदरम्यान दिली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता सर्वश्री पवार साहेब रासनकर साहेब हरुगडे साहेब देवकर मॅडम उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.