प्रतिष्ठा न्यूज

एक दिवस स्वतःसाठी वेळ काढूया; चंपाबेनच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दहावीची 2002 ची परीक्षा दिल्यानंतर थेट 2023 मध्ये भेटलेल्या चेहऱ्यांना ओळखून त्या वेळच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गेल्या 21,22 वर्षातील सुखदुःखांना वाटून घेत तासगावच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर तासगाव 2001/2002 च्या बॅचचें गेट-टुगेदर उत्साहात पार पडले.एक दिवस स्वतःसाठी वेळ काढूया आठवणींचा खजिना सोबत नेऊया म्हणत गेट-टुगेदर चा कार्यक्रम रोटरी ग्रीन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.दुपारी चार वाजता सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आले,यात जे काळाच्या ओघात सोडून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच विविध स्तरावर आपली कामगिरी योग्य पद्धतीने बजावणाऱ्या अनेक मोठमोठ्या पदावर आपली छाप टाकणारे ही अगदी लहान होऊन या गेट-टुगेदर चा आनंद लुटताना यावेळी दिसले.उपस्थित असलेल्यानी आपली ओळख करून देत सध्या आपण काय करतो याची माहिती करून दिली.व्यासपीठावर गेलेल्या अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्या ताज्या केल्या.अतिशय हास्यविनोद तसेच भावनिक वातावरणात कार्यक्रम पार पडला. यावेळी गानी लावून संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला.तेरे जैसा यार कहा,म्हणत मै हु डॉन गाणी गाऊन अनेकांनी आपल्या अंगातील कला सादर केली.त्यानंतर भोजन आणि आईस्क्रीम पार्टीने कार्यक्रमाची सांगता झाली. इथून पुढच्या काळात फॅमिली गेट टुगेदर तसेच दरवर्षी भेटायचे तसेच सर्वांनी एकत्रित एक कुटुंब म्हणून सहभागी व्हायच असे ठरवून कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी रवींद्र दिवटे, अभिषेक कोकणे, रोहन पवार,स्वप्निल पाटील,अजय माळी, अमर पाटील, विशाल खेराडकर, मयूर हिंगमिरे, सुदीप जवळेकर, सुप्रिया शिंदे,संगीता पवार,चैत्राली शिंदे, अन्नपूर्णा शेटे,स्वप्नाली बाबर अन्य क्लासमेंट उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.