प्रतिष्ठा न्यूज

इयत्ता बारावी परीक्षा निकाल उद्या दुपारी 2 वा. जाहीर होणार

प्रतिष्ठा न्यूज राजू पवार
नांदेड /पुणे दि.24 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा 2023 चा निकाल उद्या दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे ,शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक ,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक 25 /5 /2023 रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत.
1) mahresult. nic.in
2) https://hsc.maheresults.org.in
3) https://hscresult.mkcl.org
4) www.mahahsscbord.in
वरील संकेतस्थळावर निकालाची प्रिंट सुद्धा उपलब्ध होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.