प्रतिष्ठा न्यूज

मिरजेच्या स्वरविहार संगीत विद्यालयातील शंतनु जोगळेकर विशारद पदवीने सन्मानित होत भारतामध्ये प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांचा पदवीदान समारोह नुकताच मुंबई संपन्न झाला.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तबला विशारद परिक्षेमध्ये स्वरविहार संगीत विद्यालय ,मिरज मधील विद्यार्थी शंतनु दिलीप जोगळेकर (तासगाव) याने सर्वाधिक गुण प्राप्त करून भारतामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल त्याला विविध अशा एकूण सात पुरस्कारांसह विशारद पदवीने सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृह ,नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अमी उपाध्याय ( कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ,अहमदाबाद) तसेच गांधर्व महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कारासाठी शांतनूला गेली अनेक वर्षे स्वरविहार संगीत विद्यालायातर्फे अनेक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देणारे वैभव यमगर, मिरज यांचे गुरू म्हणून विशेष असे मार्गदर्शन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.