प्रतिष्ठा न्यूज

प्रा. प्रतिभा भारत पैलवान यांना भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड 2022 जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असणाऱ्या कवयित्री प्रा. प्रतिभा भारत पैलवान यांना संविधान दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स ॲवार्ड 2022 नुकताच जाहीर झाला आहे. लोकसभा सदस्य खासदार नवनीत रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या संविधान सन्मान दिवस समारोह समितीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार मानाचा समजाला जातो. 26 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात
‘संविधान दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. आझादी का अमृत महोत्सवा अंर्तगत भारताचे संविधान आणि त्यासंदर्भात शिक्षक,प्राध्यापकांसाठी देशपातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाचा एक भाग आणि प्रा. प्रतिभा भारत पैलवान यांनी गेल्या वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रा. प्रतिभा पैलवान यांचे साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांचे ‘रित्या ओंजळीत माझ्या’ आणि ‘तुझी माझी मैत्रवेल’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत, तसेच ‘पद्मरत्न 2022’ या दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. ‘एका उमलत्या काळीचा अंत… रागिणी’ ही त्यांच्या
महाविद्यालयाच्या एका प्रतिभाशाली विद्यार्थिनीची स्मरणिकाही त्या प्रकाशित करत आहेत. इतरही अनेक नवीन प्रोजेक्टवर त्यांचे काम सुरू आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी समाजातील सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
काचपेटीतील लेखणी, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिनाच्या दिवशी नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.