प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत पूर बाधित भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मधील वार्ड क्र १२ १३ ,१४ तर मिरज मधील वार्ड क्र ५ आणि २० मधील पूर ओसरल्या नंतर लगेच स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिले आहेत. सर्व मनपा मधील पूर बाधित क्षेत्रावर मा आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे.
पूर ओसरल्यावर नंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांना गैर सोय होऊ नये या साठी दक्षता घेण्यात येत आहे.
अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियंत्रणात डॉ रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी , वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगिर, अनिल पाटील यांच्या देखरेख खाली सर्व टीम कार्यरत असणाऱ आहे .
१२१८स्वच्छता कर्मचारी यांच्या उपलब्धता करून देण्यात येत आहे. स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या साधारणपणे २०० वाहनांच्या वापर स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे,
२० ट्रॅक्टर द्वारे वरील भागात स्प्रिंग। करण्यात दोन वेळेस करण्यात येणार आहे,पावडर देखील टाकण्यात येणार आहे, पुराचे साठलेले पाणी निचरा करण्यासाठी सेक्शन व्हॅन वापर करण्यात येणार आहे.
सध्या पाणी पातळी ३९.६अशी असून जस जशी पाणी पातळी कमी होईल तसतसे स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ रवींद्र ताटे यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.