प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या दीपक शिंदे यांची जलसंपदा विभाग-सहाय्यक अभियंता पदी निवड झालेबद्दल जिवाभावाची माणसं ग्रुप कडून सत्कार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: आई-वडीलांचे कष्ट, सुसंस्कार व मोठ्या भावाचे प्रोत्साहन आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे,माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती यशाचे वाटेकरी आहेत असे प्रतिपादन जलसंपदा विभाग सहायक अभियंता पदी निवड झालेले दीपक शिंदे यांनी केले.ते तासगाव येथील ‘जिवाभावाची माणसं’ ग्रुप आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.जिवाभावाची माणसं या ग्रुपचे सदस्य रोहन शिंदे यांचे बंधू दीपक चंद्रकांत शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत जलसंपदा विभाग सहायक अभियंता पदी निवड झाली.याबद्दल ‘जिवाभावाची माणसं’ या ग्रुपच्या वतीने दीपक शिंदे यांचा परिवारा समवेत सत्कार आयोजित केला होता.यावेळी,या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी शिक्षण मंडळ सभापती किशोर गायकवाड यांच्या हस्ते दीपक शिंदे व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,कुटुंबातील सर्व सदस्यांनी तसेच आपण सर्व ‘जिवाभावाची माणसं’ या ग्रुपचे सदस्यांनी सत्कारातून केलेले कौतुक नेहमी मला महाराष्ट्र शासनाची सेवा बजावताना प्रोत्साहन देईल.यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन बोलताना उद्योजक संतोष पेटकर यांनी ग्रुपच्या वतीने दीपक शिंदे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सतीश लिंबळे यांनी तर,सूत्रसंचालन अभिनव तावदर यांनी केले.सत्कार समारंभ प्रसंगी जिवाभावाची माणसं ग्रुप सदस्यांनी मिठाई वाटून शिंदे यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार किरण देवकुळे यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.