प्रतिष्ठा न्यूज

लक्ष्मीवाडी यथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या योजनेविषयी व खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : लक्ष्मीवाडी  यथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या योजनेविषयी व खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण पार पाडण्यात आले.  या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये घेण्यात येणारे मका भुईमूग उडीद मूग इत्यादी पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन केले तसेच आंतरराष्ट्रीय तरणधान्य वर्ष म्हणून ज्वारी बाजरी वरी राळा  राजगिरा इत्यादी  पिकांविषयी महत्त्व सांगितले तसेच मका पिकातील   वेगवेगळ्या वाणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच . शेतीशाळा या माध्यमातून   बियाणाचे वाण निवड व बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी धनाजी दिवटे दीपक जाधव विनोद जाधव सुखदेव खोत चंद्रकांत बरगाले  शामराव नाईक  रमेश नाईक दादासो कागवाडे नामदेव तांदळवाडे नितीन कोरे रमेश गुरव शरद पाटील  शिंदेवाडी चे उपसरपंच माननीय संदीप पाटील  व श्री एस ए सूर्यवंशी कृषी अधिकारी आरग तसेच आरग  लक्ष्मीवाडी व शिंदेवाडी   या गावातील शेतकरी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.