प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस- शेतीचे मोठे नुकसान- वाहतूक ठप्प- शाळांना सुट्टी: नागरिकांनी दक्ष राहावे- जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यात काल रात्री पासून शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने झोडपले असून तो अजूनही चालू आहे.एकंदरीत जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून येण्या जाणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर खोलगट भागातील शेतीत पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या पावसामुळे अनेक गावांचा नांदेड शहराशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. सद्या तरी पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रशासनाने मात्र नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गरज पडेल तेव्हाच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
शाळांना उद्या सुट्टी:- हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसुचनेनुसार नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून आणि सध्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पत्र काढून नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि 28 जुलै रोज शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.