प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय शूटींगबाॅल स्पर्धेसाठी नांदेडचे खेळाडू मध्यप्रदेशला रवाना

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.13 : राज्य शूटींगबाॅल असो.च्या मान्यतेनुसार श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शूटींगबाॅल स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीकेल्यामुळे अभिजीत जाधव व कु.पायल पंदीलवाड या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सदरील खेळाडूंना राज्य शूटींगबाॅल असो.सहसचिव तथा राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड चे क्रीडा शिक्षक रामनबैनवाड टी.एन. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
41वी राष्ट्रीय शूटींगबाॅल स्पर्धा विदिशा मध्यप्रदेश येथे 12 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहेत. सदरील स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी.एम.हंगरगे, उप.मु.अ डाॅ.पी.एम.यमलवाड, पर्यवेक्षक श्री पी.एम.सावंत, प्रा.आर.डी.देशमुख, टी.एन. रामनबैनवाड, बी.के.कदम , श्री अमोल भंगाळे,श्रीमती गिरी मॅडम ,लत्ता जाधव यांनी शूभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.