प्रतिष्ठा न्यूज

भाजपा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा भव्य सत्कार

प्रतिष्ठा न्यूज  
सांगली  प्रतिनिधी : शनिवार दि. 29-7-2023 रोजी सकाळी 10 वाजता कच्छी भवन,राम मंदिर सांगली येथे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश ढंग, जिल्हाध्यक्ष सांगली शहर जिल्हा व मा. निशिकांत दादा भोसले पाटील जिल्हाध्यक्ष सांगली ग्रामीण जिल्हा यांचा सांगली शहर जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  हा सत्कार समारंभ मा ना.डॉ सुरेश भाऊ खाडे साहेब ( कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री )मा.खा.श्री संजय काका पाटील, मा. आम. सुधीर दादा गाडगीळ, मा. आम. गोपीचंदजी पडळकर, मा. दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर (सांगली लोकसभा प्रमुख )मा. शेखरजी इनामदार (सांगली विधानसभा प्रमुख)मा. श्री मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सांगली शहर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चा, आघाडी, प्रकोष्टचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.