प्रतिष्ठा न्यूज

डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाची डॉ. डी. वाय. पाटील सह. साखर कारखान्यास शैक्षणिक भेट

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आज दि.९ऑक्टो. २०२३ रोजी डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथील एम. एस्सी भाग १ व २ च्या विद्यार्थ्यांची डॉ. डी. वाय. पाटील सह. साखर कारखाना असळज – पळसंबे येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सहवीज प्रकल्प, डिस्लरी प्रकल्प आणि केमिस्ट्री लाॅब इत्यादींबाबत माहिती देण्यात आली. या शैक्षणिक भेटीकरीता संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई व सचिव आणि प्र-प्राचार्या डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच, या भेटीकरिता संचालक सहदेव कांबळे, कार्यकारी संचालक नंदु पाटील, चिफ केमिस्ट्र बाजीराव पाटील, अभियंता अजित पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा. ए. एस. कांबळे आणि प्रा. एस. एस. देसाई उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.