प्रतिष्ठा न्यूज

कसब्याचा निकाल महाराष्ट्राला दिशा देणारा : पृथ्वीराज पाटील / रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर काँग्रेस कमिटीसमोर जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. हा निकाल महाराष्ट्राला दिशा देणारा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. या विजयानंतर सांगली शहरात काँग्रेस भवनसमोर मोठा जल्लोष करण्यात आला.

श्री पाटील म्हणाले, एखाद्या कार्यकर्त्याने जनतेला वेळ देऊन त्यांच्या सुख- दुःखात सहभागी होत, येणाऱ्या प्रत्येक माणसाचे काम करण्याची इच्छाशक्ती ठेवली की, जनता कशी त्या कार्यकर्त्याचा मागे राहते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र धंगेकर.

ते म्हणाले, दबावतंत्राचा वापर करून सरकार पाडा, घोडेबाजार करा, केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा व अतिरेकी वापर करा, चिन्ह व पक्ष चोरा, पण शेवटी जनता हीच जनार्दन आहे, हे कुणीही विसरता कामा नये. आ. रवींद्र धंगेकरांचं अभिनंदन व येणाऱ्या काळात त्यांनी जनतेची अशीच सेवा करावी या सदिच्छा!

कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगलीशहर व जिल्हा काँग्रेसकडून विजय साजरा करण्यात आला. यावेळी सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, आदिनाथ मगदूम, श्रमण मगदूम, बाबगोंडा पाटील, श्रीधर बारटक्के, नामदेव पठाडे, सुभाष पट्टणशेट्टी, प्रल्हाद नरळे, सुरेश गायकवाड, विश्वास यादव, मूवीत कोळेकर, सिद्धराया घनाचार्य, पंडित पवार, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, पैगंबर शेख, मौला वंटमोरे, लालसाब तांबोळी, प्रकाश माने इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित ढोले म्हणाले, रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या विजयाची सलामी आहे. या पुढील काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला चपराक बसणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.