प्रतिष्ठा न्यूज

रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या प्रश्नी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात दि. ३० ऑगस्ट रोजी चाबूक फोड आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला एक नाही तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे. तरी हे काम पूर्ण होत नाही. ही मुदतवाढ कोणी दिली? मुदतवाढ देण्याचे अधिकार कोणाला आहेत? या मुदत वाढीच्या दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे व जनतेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन यांना नुकसान भरपाई देणार आहे का? आता दिलेली 31 सप्टेंबर 2024 ची मुदत पर्यंत हा पूल पूर्ण होणार आहे का? आणि झाला नाही तर काय कारवाई करणार? रेल्वे पुलाच्या ठेकेदाराला कामासाठी मुदत वाढ कोण देतय? ठेकेदार स्पष्टीकरण देत नाही की तो कधी काम पूर्ण करणार? याचा जाब रेल्वे अधिकाऱ्यांना शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ११:०० वाजता सांगली रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड येथे चाबूक फोड आंदोलन करून जाब विचारणार आहेत.

या चाबूकफोड आंदोलनासाठी सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार, माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा, संचालक योगेश देसाई, उमेश विचारे, श्रीरामनिवासी बजाज, रमेश बंग, माधवनगर भाजपाध्यक्ष मनजित पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, शिवसेना उबाठा गटाचे सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील, सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेंद्र बोळाज, बाळासाहेब कलशेट्टी, गणपती पेठ व्यापारी असोसिएशनचे समीर शहा, भाजपा मंडल अध्यक्ष निलेश हिंगमिरे हे करणार आहेत. तरी या प्रतिकात्मक चाबूक फोड आंदोलनामध्ये सर्व व्यापारी नागरिक यांनी बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.