प्रतिष्ठा न्यूज

तासगावची सी.ए.सायली चव्हाण हिचा चार्टर्ड अकाउंटंट सांगली शाखेच्या वतीने सन्मान…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, सांगली शाखेच्या वतीने जिल्ह्यातील नवीन निवड झालेल्या 31 चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तासगावची चार्टर्ड अकाउंटंट कु.सायली अविनाश चव्हाण हिचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सीए शिरीष किर्लोस्कर तर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर अधिकारी अजय पवार तसेच केंद्रीय जीएसटी सांगलीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर सांगली शाखेचे पूर्व अध्यक्ष सीए उमेश माळी, सीए श्रेयस शहा उपस्थित होते.
यावेळी नवीन निवड झालेल्या उमेदवारांनी तसेच पालकांचे वतीने ज्येष्ठ कर सल्लागार अविनाश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजन सांगली शाखेचे अध्यक्ष सीए मनीष आहुजा, उपाध्यक्ष सीए कुशल खंडेलवाल, सचिव सीए निलेश पाटील तसेच खजिनदार शोभना जग्यासी यांनी केले.या कार्यक्रमास सहकार्य ज्ञानेश यांनी केले.नवीन निवड झालेल्या उमेदवाराबरोबरच त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ सीए आर जी हंबर,सीए विवेक कुंभोजकर,सीए एल के गायकवाड, सीए भूपाल सिंह सूल्ह्यान हे उपस्थित होते.यावेळी नवीन निवड झालेल्या सी ए.सायली चव्हाण पुढील शिक्षणासाठी एम एस फायनान्स साठी दि युनिव्हर्सीटी ॲाफ टेक्सास- दलास-अमेरिका येथे गेली असल्याने पालक अविनाश चव्हाण व सौ.सविता चव्हाण यांनी सत्कार स्वीकारला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.