प्रतिष्ठा न्यूज

बहुजनांच्या शिक्षणासाठी पृथ्वीराज बाबांची सन्मानाने प्रेरणादायी मदत – विजया पृथ्वीराज पाटील ; कुपवाडात पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वह्यांचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. ४ : शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. विकासात मागे पडलेल्या बहुजनांच्या जिल्हा परिषद शाळेतील लेकरांना प्रेरणा मिळावी म्हणून पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाडमध्ये झेपी शाळेतील मुलांच्या आणि उर्दू शाळेत वह्या वाटप करण्यात येत आहे. आज घर आणि देशाला मोठे करणाऱ्या सुसंस्कृत व अभ्यासू मुलामुलींची गरज आहे. माणुसकी जपणारी पिढी घडवणे हा पृथ्वीराज बाबा आणि फौंडेशनचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन विजया पृथ्वीराज पाटील यांनी केले. कुपवाड येथील झेपी शाळांमध्ये त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते ८५० वह्यांचे वाटप करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कुपवाड शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना पृथ्वीराज पाटील फौंडेशन व पृथ्वीराज बाबा यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते आण्णासाहेब उपाध्ये, शहराध्यक्ष सनी धोतरे, अक्तरभाई व रुबिना मुजावर, अनिल कवठेकर, अशोक रास्कर, राजेंद्र पवार, समीर मुजावर, अमोल कदम, राहूल पाटील, सिकंदर मुल्ला, फिरोज मुजावर, श्रीकृष्ण कोकरे, सिकंदर मुजावर, दिलीप धोतरे, मनोज अदाटे, भिमराव सरोदे व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.