प्रतिष्ठा न्यूज

विसापूरमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात : हर घर झेंडा मोहिमेची जनजागृती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आज विसापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या  कार्यक्रमाची जनजागृती करून या कार्यक्रमांतर्गत हर घर झेंडा मोहिमेची जनजागृती करण्यात आली.यावेळी  रा.शा.माने पाटील विद्यामंदिर विसापूर च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पथनाट्य,लेझीम,झांज पथक,भजनी मंडळ अशा विविध उपक्रमातून जनजागृती केली.यावेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 चे विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी तासगाव तालुक्याचे तहसीलदार रांजणे साहेब,तासगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी मोहिते साहेब,गट शिक्षणधिकारी लावंड साहेब,सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर, तासगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष दिलीप (नाना) माने,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक झांबरे साहेब,रा.शा. माने पाटील विद्या मंदिराचे मुख्याध्यापक,शिक्षक,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी विसापूर मधील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार साहेबांनी तिरंगा 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये कशा पद्धतीने लावायचा याचे मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते तिरंगा झेंड्याचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.