प्रतिष्ठा न्यूज

आद्य नाटककार विष्णुदास भावे स्मृतीदिनानिमित्त राजा विक्रमादित्य या दीर्घांकाचे सादरीकरण

प्रतिष्ठा न्यूज/ मिलिंद चितळे
सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे स्मृतीदिनाचे औचित्य साधून दि.९ ऑगस्ट रोजी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगली आणि अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती सांगली यांच्या सहकार्याने राजा विक्रमादित्य या दीर्घांकाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक अरुण दांडेकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, उपाध्यक्षा सौ. अंजली भिडे, कोशाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भालचंद्र चितळे, अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांच्या हस्ते नटराज पुजन आणि भावेंच्या प्रतिमेला हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुकुंद पटवर्धन यांनी सर्वांचे स्वागत केले. अरुण दांडेकर आणि डॉ. शरद कराळे यांनी शुभेच्छा दिल्या. राजा विक्रमादित्यचे दिग्दर्शक प्रशांत जगताप यांनी दिर्घांका विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धनश्री कुलकर्णी यांनी केले.
ललित कला व नाट्यतंत्र कला महाविद्यालय शांतीनिकेतन, सांगली या संस्थेचे कलाकार यांनी ही कलाकृती सादर केले. एकूण 22 कलाकारांचा समावेश असलेल्या या कलाकृतीत गण, बतावणी, वग, भजन, शाहिरी पोवाडा अशा लोककलांचा समावेश होता. याचं लेखन राजेंद्र पोळ यांनी तर दिग्दर्शन प्रशांत जगताप यांनी केलं आहे. कार्यक्रमास प्राचार्य भास्कर ताम्हणकर, विशाल कुलकर्णी विवेक देशपांडे, विलास गुप्ते, बलदेव गवळी,सौ. मेधा केळकर, शशांक लिमये उपस्थित होते अशी माहिती नाट्य परिषद, सांगली शाखेचे कार्यवाह सनित कुलकर्णी यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.