प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया सत्तेसाठी होत्या धर्मासाठी नव्हत्या तसेच ते मानवतावादी राजे होते : शिव व्याख्याते- तुषार उमाळे

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, व 32 कक्षांच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती नांदेडच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी – मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- शिवश्री कामाजीराव पवार हे होते तर उद्घाटक म्हणून नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी- मा.अभिजीत राऊत व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक- मा.श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड महानगर पालिकेचे आयुक्त- मा.महेशकुमार डोईफोडे, प्रमुख वक्ते- तुषार उमाळे (वर्धा), माजी सहसचिव- अनिल मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी- रेखाताई काळम, माजी महापौर- जयश्रीताई पावडे, उपमहापौर- सतिश देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख- दत्ता पाटील कोकाटे, कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष- गोविंदराव शिंदे नागेलीकर, मधुकरराव देशमुख, प्राचार्य- डॉ.पंजाबराव चव्हाण, इंजि – शे.रा.पाटील, इंजि- व्ही टी शिंदे, प्रा. संतोष देवराये, संभाजी शिंदे, छावाचे प्रदेशाध्यक्ष- पंजाब काळे, अविनाश कदम, डॉ. गायत्रीताई वाडेकर, डॉ. स्मिताताई टेंगसे, शिवराज जवळेकर, जमात ए इस्लामचे खादीरसाब, आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख वक्ते तुषार उमाळे यांचे व्याख्यान झाले यात उमाळे यांनी शिवरायांच्या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने आणि आनंदाने राहत होते व त्यांचा महाराजांवर पूर्ण विश्वास होता. शिवरायांच्या काळातील लढाया या सत्तेसाठी होत्या धार्मिक नव्हत्या कारण छत्रपती शिवाजी महाराज हिंदू-मुस्लिम असा भेद करत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण श्रीमंतांना छाटणे व गरिबांना वाटणे असे मानवतावादी राजे होते. महाराजांनी दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांसाठी पहिल्यांदा कर्जमाफी केली, हाच वसा आणि वारसा आयुष्यभर पुढे चालवला. सध्याच्या युवकांनी तसेच पालकांनी मोबाईल वापरण्यावर काही बंधने घालून पुस्तक वाचुन  पुस्तकप्रेमी झाले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक- तुषार उमाळे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी-अभिजित राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन कार्य केले त्याच प्रमाणे नांदेड येथील मराठा सेवा सर्व समाजाला सोबत घेऊन कार्य करत आहे हे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
सुदेश देशमुख, सरस्वती धोपटे, व्ही.टी.शिंदे, सोपान क्षिरसागर, पंडीत कदम, उद्धव सुर्यवंशी, नानाराव कल्याणकर, पंजाब काळे, अविनाश कदम, निळकंठ गव्हाणे, संकेत पाटील, आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे यांनी केले.तर आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील यांनी केले.
प्रथम-छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन जिजाऊ वंदना घेण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा शिवजन्मोत्सव समिती स्वागताध्यक्ष- परमेश्वर पाटील, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष- नानाराव कल्याणकर, जिल्हाध्यक्ष- उद्धव सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष- संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- भगवान कदम, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- डॉ विद्या पाटील, जिल्हाध्यक्ष- अरुणा जाधव, वनिता देवसरकर, सुमित्रा वडजकर, पी के कदम, शिवाजी पाटील, बळिराम फाजगे, विक्रांत खेडकर, अंकुश कोल्हे, प्रसिद्धी प्रमुख- बालाजी सिरसाट, कमलेश कदम, सतीश धुमाळ, पवन सिरसाट, राधाकृष्ण होगे, प्रल्हाद दुरपडे, बालाजी देशमुख, प्रविण जाधव पिंपळदरीकर, परमेश्वर खोसे, गोपाळ कदम, पंडीत कदम, अशोक कदम आदिंसह इतरांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन- रमेश पवार यांनी केले, तर आभार- नानाराव कल्याणकर यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.