प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांच्या सांगली महापालिका क्षेत्रात प्रभाग निहाय आढावा बैठकीस सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खासदार संजय काका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात झाली. महापालिका क्षेत्रात पुढील 10 दिवस खासदार संजयकाका पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आज या संपर्क अभियानाची सुरुवात सांगलीतील प्रभाग 14 मधून करण्यात आली. या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माजी नगरसेवक युवराज बावडेकर , भारती दिगडे सुबराव मद्रासी, उर्मिला बेलवलकर , वीज मंडळाचे खांडेकर साहेब, अरविंदभाऊ तांबेकर , सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ ,महसूल विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
या आढावा बैठकीत प्रामुख्याने रस्ते, लाईट, गटारी , स्वच्छता, अतिक्रमण तसेच महिला शौचालय यासह पाणी समस्या , वाहतूक समस्या, रेशन कार्ड बाबतच्या अडचणी नागरिकांनी उपस्थित केल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.