प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार : आणखी आठ घरांची पडझड

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.13 : गुरुवार पासून तालुक्यात सर्वच ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होत असून अनेक घरांची पडझड झाली आहे. व ऐन पावसाळ्यात कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
मागील आठवड्यात नऊ घरांची पडझड होऊन दोन लाखाच्या आसपास नुकसान झाले होते. तर या दोन दिवसात पाच घरे व तीन गोठ्यांची पडझड होऊन जवळजवळ दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
सांगशी येथील मधुकर श्रीपती चव्हाण यांची घराची भिंत पडली असून गोठा पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. त्यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले  आहे. तळये येथील हिंदुराव भाऊ चव्हाण यांचे घरावर झाड पडल्याने भिंत व पत्र्याची पाने फुटून २० हजारांचे नुकसान झाले आहे. गारिवाडे  येथील दशरथ दगडू कदम यांचा गोठा पडून २० हजारांचे नुकसान झाले आहे. तर प्रकाश रामचंद्र पडवळ खोकुरले यांची यांची घराची भिंत, लहू धोंडीराम पाटील असळज यांचे घराची भिंत, बाळू लक्ष्मण बोडेकर बावेली यांची घराची भिंत, श्रीरंग लहू पाडावे गारीवडे यांचे गोठ्याची भिंत, व गणपती बाबाजी जिन गरे गारवडे याचे गोठ्याची भिंत अंशतः कोसळून नुकसान झाले आहे.
गगनबावडा परिसरात  जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने शनिवार पासून कुंभी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ६०० क्युसेक  विसर्ग वाढविल्याने एकूण ९०० क्युसेक इतका विसर्ग चालू आहे. कुंभी धरण ९१ टक्के भरले असून पाणीसाठा ७०.११ द.ल.घ.मी.इतका झाला आहे.

सांगशी येथील मधुकर श्रीपती चव्हाण यांची घराची भिंत पडली असून गोठा पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. त्यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले. व घराचीही भिंत कोसळली आहे. मोलमजुरी करून  उदरनिर्वाह करतात. या प्रसंगाने त्यांचा धीर खचला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.