प्रतिष्ठा न्यूज

स्काय सिटी ‘ गगनबावडा ‘ पर्यटकांच्या गर्दीने फुलला : पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिककाना ‘अच्छे दिन’

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.४ : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यामुळे पर्यटकांनी फुलला आहे.’प्रति महाबळेश्वर’ म्हणून गगनबावड्याचा उल्लेख केला जातो. थंडी पडू लागल्याने, शाळेच्या सुट्यामुळे हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ गगनबावड्यात सध्या पहावयास मिळत आहे.कोकणाला जोडणारा दुवा करूळ व भुईबावडा घाट.या दोन्ही  घाटा मुळे गोवा,सिंधुदुर्ग यासह कोकण दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची रीघ लागली आहे.
गगनबावड्यातील निसर्ग सौदर्यात भर घालणारे लखमापूर ,अणदूर ,कोदे,वेसरफ या ठिकाणी  असणारे तलाव पर्यटकांना भुरळ घालत आहेत. पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे .पाण्याने भरलेले तलाव, सभोतालची हिरवळ, गर्द झाडे , कट्टे ,मनसोक्त पोहणे त्यामुळे तलावा ठिकाणी  कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत.त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत आहेत .हिरवेगार डोंगर माथ्यामुळे पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटते.
गगनबावड्यातील गगनगिरी महाराजांच्या गगनगिरी मठावरून  (गगनगड )कोकण दृश्य टिपन्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. दोन्ही घाटमाथ्या च्या मध्यभागी असणाऱ्या या गगनगडावरून  कोकण दृश्य टिपता येतात . पळसंबे येथील शांत वातावरणातील  ‘रामलिंग मठ’ (पुरातन लेणी ) पुरातन पांडवकालीन काळाची आठवण करून देतात.सांगशी येथील पाचव्या शतकातील चालुक्यकालीन शिलालेख एक प्रेम कहानी आहे.बोरबेट येथील मोरजाई व वेताळ माळ येथील निसर्गाच्या सानिध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो.
सध्या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सुद्धा सुरू असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे.

  *मद्यपिंचा पर्यटकांना त्रास*
तलावाजवळ पाणी असल्याने कुटुंबासह आलेले अनेक पर्यटक स्वतः जेवण तयार करून खातात.त्याठिकाणी काही मंडळी दारू पिऊन तर्र अवस्थेत असतात.त्यामुळे महिला पर्यटकांना , स्थानिक स्त्रिया व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे त्या मद्यपिंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व ग्रामस्थातून  होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.