प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ बहिष्कारावर ठाम : रावसाहेब पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.६ : राज्यातील शिक्षणसंस्था, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी शासनास निवेदने दिली.. समक्ष भेटून मा. शिक्षणमंत्री व मा. शिक्षण आयुक्तांना विनंती केली. परंतु अद्याप शासनाने तोडगा काढला नाही. जोपर्यंत मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री महामंडळाशी चर्चा करुन निर्णय घेऊन लेखी पत्र देणार नाहीत तो पर्यंत दि. २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार कायम राहील. खासगी शिक्षण संस्थांच्या इमारती व मनुष्यबळ लेखी परीक्षेसाठी दिले जाणार नाही व दि. १५.२.२४ रोजी राज्यभर शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा निर्णय उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ फेब्रुवारी रोजी पुणे येथे खंडेराय प्रतिष्ठान येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याचे पत्रक महामंडळाचे सरकार्यवाह विजय गवाणे व रविंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध केल्याचे महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सांगितले आहे. शासनाने तातडीने महामंडळ शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन प्रश्न निकालात काढून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पाऊल उचलावे. मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी या प्रश्नी लक्ष घालून दिलासा द्यावा अशी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांत प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.