प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुक्यातील- नांदगाव, चिंचोली, कांजाळा येथील ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल धक्कादायक

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील नांदगाव, चिंचोली, कांजाळा- येथे झालेल्या अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्यामुळे सर्वाधिक विक्रमी मतदान झाले. त्यामुळे या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र येथील तिन्ही निकाल धक्कादायक लागले आहेत.
– नांदगाव येथे सरपंच पदाचे उमेदवार संतोष पाटील भरकडे यांच्यासह, 7 पैकी 4 जागा त्यांच्या गटाचे उमेदवारांनी जिंकून विजय संपादन करत सत्ता मिळवली आहे. तर प्रतिस्पर्धी गुरूकृपा पॅनलला केवळ 3 जागावर समाधान मानावे लागले आहे. तर त्यांचे सरपंचपदाचे उमेदवार व विद्यमान उपसरपंच हरी पाटील भरकडे हे पराभूत झाले आहेत.
– चिंचोली येथे हरहर महादेव पॅनलच्या जयश्रीताई जाधव सरपंच पदी विजयी होत. 7 पैकी 4 जागावर विजय मिळविला आहे. तर विद्यमान सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर यांच्या पॅनलला केवळ 3 जागा मिळाल्या असुन, या निवडणुकीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई जाधव हया पराभूत झाल्या आहेत. – कांजाळा येथे गुरूकृपा कडून सरपंचपदाचे उमेदवार श्यामसुंदर लोहकरे यांचे गटाने बाजी मारत सरपंचपदासह 9 पैकी 8 जागी विजय मिळवीला आहे. तर 1 जागा अपक्षाने जिंकली आहे. येथे 3 पॅनल उभे होते. मात्र देविदास लोहकरे व बालाजी मळगदे यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे त्यांची मोठी नामुष्की झाली आहे.
एकंदरीत या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत निकाल मात्र धक्कादायक लागले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.