प्रतिष्ठा न्यूज

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी बसलेले- शिवराज पाटील वडजे यांनी आपले आमरण उपोषण सोडले

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : मराठा आणि कुणबी एकच असल्यामुळे मराठा समाजाला सरसकट “कुणबी” प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ द्यावा, या मागणीसाठी दि. 31 ऑक्टोबर 2023 पासून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा समोर आमरण उपोषणास बसलेले- मा. शिवराज पाटील वडजे यांनी दि.3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू- मा. डॉ.उद्धवराव भोसले यांच्या हस्ते आपले आमरण उपोषण सोडले.
यावेळी माजी सनदी अधिकारी- मा.एकनाथ उर्फ अनिल मोरे, कुलसचिव- सर्जेराव शिंदे, प्रसिद्ध विचारवंत- डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे, साहित्यिक- डॉ.पृथ्वीराज तौर, मराठा सेवा संघाचे सल्लागार- पंडित पाटील पवळे, प्रा.अविनाश कदम, प्रा.डॉ.घनश्याम येळणे, प्रा.हाटकर, सरपंच- मारोती कदम, संजय हंबर्डे, महेश हंबर्डे, शिवराम लुटे, शहाजी हंबर्डे, गोविंद हंबर्डे, तुकाराम हंबर्डे, शिवाजी चांदणे, प्रमोद हंबर्डे, तलाठी- पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. उध्दव भोसले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही रास्त मागणी आम्ही राज्यपालांकडे पाठवणार आहोत, असे त्यांनी सांगितले. डॉ. हनुमंत भोपाळे म्हणाले, मराठा समाज कुणबी असल्याचे काही हजारात पुरावे सापडले आणि सापडत आहेत. आतापर्यंत हे पुरावे शासनाने आणि प्रशासनाने लपून का ठेवले ? पुरावे लपून ठेवल्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला. समाजाच्या प्रगतीला खीळ बसली. शासन आणि प्रशासनाने मराठा समाजावर अन्याय केला आहे. यामुळे शासनाने आणि प्रशासनाने मराठा समाजाची जाहीर माफी मागावी. प्रायश्चित्त म्हणून तातडीने मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केली.
माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे म्हणाले, आरक्षणाच्या लढा परिवर्तनाचा लढा आहे. मराठा हा कुणबी एकच असूनही काही विषमतावादी लोक फूट पाडण्याचे काम करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपोषणकर्ते- शिवराज पाटील वडजे म्हणाले की, शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी भावना  व्यक्त केली.
याप्रसंगी सर्व विद्यापीठातील अधिकारी, सर्व संकुलाचे संचालक, प्राध्यापक यांच्यासह दत्ता पाटील येवले,  कुंडलिक काळे, गणेश भोसले, सचिन पवळे, रोहिदास दुधाटे, चिंतन हंबर्डे, गंगाधर पुंड, सखाराम केदारे, कैलास घोगरे, आकाश मोरे, राहुल पडोळे, सचिन खडके, गोविंद सूर्यवंशी, पवन वडजे, ज्ञानेश्वर कंधारे, विजय पांगरीकर, योगेश पाटील, प्रमोद राऊत, ऋषिकेश, अजय कदम, गोविंद मोरे आदींनी उपोषण यशस्वी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.