प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थिनीची मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक वाटचाल

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स यांच्या मार्फत कृष्णा व्हॅलीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाने 4 x 100 रिले शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच अदिती सचिन चवदार हिने 200 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक, प्राची उमाकांत शहा हिने लांबउडी या प्रकारात द्वितीय क्रमांक व शौर्या विनोद कुंभोजे हिने 100 मीटर शर्यतीत तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये मुलींचा केंब्रिजचा संघ जास्त पदक घेणारा संघ ठरला.
स्पर्धेतील या यशाबद्दल त्याचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
मुलीनंच्या यशात संस्थेचे चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील सर, शाळेच्या अधीक्षिका सौ. ख्रिस्तीना मार्टिन मॅडम, प्रशासक मा.रफिक तांबोळी सर, उपमुख्याध्यापिका सौ पद्मा सासनुर मॅडम, समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम, व क्रीडा शिक्षक (मार्गदर्शक) चंद्रशेखर कांबळे सर , राजेश कुरणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.