प्रतिष्ठा न्यूज

पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेंच्या पाठपुराव्यानं उजळणार आटपाडीचं सिद्धनाथचं मंदिर

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : आटपाडी तालुक्यातलं खरसुंडी गावातलं श्री सिद्धनाथं देवाचं मंदिर म्हणजे एक पवित्र तीर्थक्षेत्र. आमची या देवावर भरपूर श्रद्धा. गाव सोडून आम्ही शहरात राहायला गेलो असलो तरी आबा-आज्यांपासून चालत आलेली परंपरा कधी मोडली नाही, म्हणजे आजतागायत देवाची यात्रा चुकली असं उभ्या आयुष्यात घडलं नाही. देवाच्या दारात कधी काय पण मागितलं तर देव भरभरून देणार अशी याची ख्याती. लाखो भाविक-भक्त देवाच्या चरणी लीन व्हायला वर्षातून एकदा का विना येणार हे ठरलेलं असतं. एवढी लोकं देवाचं दर्शन घ्यायला येत्यात मात्र त्यांची *खातरजमा काही व्यवस्थित इथं होत नाही हे कुठेतरी सारखं खटकत होतं.
इथल्या स्थानिक प्रशासनाची बोंबाबोब आणि प्रत्येक वेळी दुर्लक्ष यामुळे भाविकांना पायाभूत सुविधा काही मिळत नव्हत्या. देवस्थानचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश होणं खरंच गरजेचं होतं. कोणीतरी खमक्या माणूस पुढं येणं महत्त्वाचं होतं. त्यातच सगळ्यांच्या हाकेला धावून येणारे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सुरेश भाऊ मात्र या परिस्थितीत धावून आले. सिद्धनाथ हे कुलदैवत असल्याने याबाबतीत भाऊंनी अधिकच उचल खाल्ली. देवाचं काम आहे आणि ते झालंच पाहिजे यासाठी त्यांनी कागदांची जुळवाजुळव जोरात सुरु केली. ज्यांनी आदी पाठपुरावा केला होता त्यांच्या ही भेटी भाऊंनी घेतल्या, विचारपूस केली.
२६ डिसेंबर २०२३ ला भाऊंनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांकडं हा विषय लावून धरला. २९ डिसेंबर २०२३ ला मंत्रिमंडळ उपसमितीत हा विषय मंजूर ही झाला. पण इथंच माशी शिंकली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानं सारंच थांबलं. लोकसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यात हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनल्याचं आम्हाला कळालं. पण आचारसंहिता उठली आणि शासनाच्या ग्रामविकास विभागानं लागोलाग हा निर्णय लागू केला आणि सुरेशभाऊंच्या हाताला यश आलं.
‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानं शासनाकडून सुरुवातीलाच ५-६ कोटी मंजूर झाल्यात. आता टप्प्याटप्पानं निधी मिळायला लागल्यावर योजलेली सगळी कमी होणार आहेत. भक्तनिवास, आरसीसी गटारी, शौचालयं, मोठं पार्किंग, स्वागत कमान, सीसीटीव्ही, सौरदिवं अशी एकापेक्षा एक कामं होणार आहेत. सुरेश भाऊंनी श्रद्धेने आणि विश्वासानं हे काम केलं याचं आम्हा सर्व भाविक-भक्तांना खूप कौतुक वाटतं. गट-तट विसरून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सिद्धनाथंचं काम भाऊंनी चोखपणे पार पाडलं याच फळ त्यांना येणाऱ्या काळात नक्कीच मिळलं आणि पुन्हा भाऊंचं या सगळ्या कामाचं लोकार्पण करतील हे मात्र नक्की.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.