प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील कंधार नायगाव मुखेड तालुक्यातील पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान : आंब्याचा मोहोर गळाला: शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार,मुखेड,नायगाव तालुक्यातील अनेक गावातील पिकांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने पिके आडवी पडली असून हाता-  त़ोडांशी आलेले रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी पिकांची नासाडी झाली आहे. तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंब्याचा मोहर गळून गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  पिके जोमात आली असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी(टाळकी) पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अद्याप पंचनामे सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कंधार तालुक्यातील कौठा,पेठवडज , बारूळ तसेच मुखेड आणि नायगाव तालुक्यातील मांजरम,गडगा,टेंभुर्णी आदी  परिसरात २५ फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने उभी पिके जागेवरच कोलमोडून पडली आहेत. खरीप हंगाम पावसाअभावी गेला. मागील नुकसान विसरून मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी केली होती. कधी
नव्हे ते कौठा परिसरात भुईमुगाऐवजी ज्वारी लागवड केली होती. पिके जोमात असतानाच वादळी वाऱ्याने नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तात्काळ
दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.