प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रीज स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. प्रथम सरस्वती व संयोगिता पाटील मॅडम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर तोहीद मुजावर उपस्थित होते यावेळी ते म्हणाले, या विद्यार्थ्यांच्याकडे पाहून मला सुद्धा माझ्या शाळेतल्या आठवणींचा उजाळा तुम्ही दिला. सक्सेस होण्यासाठी नुसती मार्कांची गरज नाही तर, स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह असला पाहिज जो तुमच्यामध्ये दिसतो. परिस्थिती कशीही असली तरी जग जिंकता आले पाहिजे. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांची चित्रफिती दाखवून सरांनी आपले मत मांडले. आयुष्य हे शंभर मीटर धावणे नाही, तर ती मॅरेथॉन आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना चांगले दिवस दाखवायचे आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, परिस्थितीची जाणीव ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे, शिक्षकांच्या बद्दल असलेला आदर, त्यांचा आशीर्वाद, ईश्वर भक्ती, कष्टाची जाणीव असली पाहिजे हे गुण विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजेत. शास्त्रज्ञ थॉमस एडिसन ची उदाहरणे देऊन मुलांना प्रोत्साहित केले. माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. जातिभेद विसरा पाहिजे, इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. आपल्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. विविधतेतून एकता असलेला आपला हा भारत देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचणे नव्हे तर डोक्यात घेणे आवश्यक आहे.
मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये मुलांनी अभ्यासासह आपले व्यक्तिमत्व सुधारण्यामध्ये सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे. आई-वडिलांनी केलेले कष्ट मुलांनी विसरू नये त्याकडे नेहमी त्यांनी लक्ष दिले पाहिजे.
या कार्यक्रमांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. त्यांच्यामध्ये असलेल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला शिक्षकांबद्दल असलेल्या त्यांच्या मनामध्ये असलेला आदरणीय भाव त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
संस्थेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टीन, पद्मा सावनुर, रफिक तांबोळी, समन्वयिका विद्या घुगरे, वंदना डोंगरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.