प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल, कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील, उपप्राचार्या अंजना कोळी व प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका संपदा केळकर यांच्या हस्ते झाले. या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन,  वैज्ञानिक प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांची भाषणे तसेच चित्रकला यांचे प्रदर्शन आणि विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला .विद्यार्थ्यांचे प्रयोग व चित्रकला प्रदर्शन बघण्यासाठी पालकांनी नोंदविला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक वर्गांकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खास मेहनत करून बनवलेल्या विविध उपकरणांमध्ये ( रडार यंत्रणा , अग्नि संकेत यंत्रणा, वी.आर.मॉडेल )  हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. कला प्रदर्शांनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
     यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री .पृथ्वीराज( बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या प्राचार्या सौ. इंदिरा पाटील व उपप्राचार्या सौ .अंजना कोळी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. या विज्ञान दिनासाठी प्रशालेच्या विज्ञान विषय प्रमुख सौ .वैशाली पाच्छापुरे व कला शिक्षिका सौ. पूजा जाधव , सौ. सुनीता गवाणकर यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले. पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.